राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पावस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी संकटात सापडले आहे.
शेतकरी इकडून तिकडून पैसे मागून उधारी शेतामध्ये पेरणी केली आहे. त्यातच संततधार पावसामुळे शेतीचे मोठ्यानुकसान झालं आहे यातचं गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील आत्माराम चौधरी यांच घर पावसामुळे कोसळलं त्या घरात पेरणीसाठी आणलेला खत ठेवलेला होता ते पावसामुळे नुकसान झाले आता मी कुठुन पैसे आणु आणि खत औषधं घेऊ अशी परिस्थिती चौधरी यांच्यावर आली आहे करीता सदर विभागाने योग्य ती चौकशी करून शेतकरी आणि घरांची पडझड यावर त्वरित पंचनामा करून आणि वेळात वेळ काढून लक्ष वेधून त्या नूकसान ग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांना योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावी अशी मागणी डोंगरगाव येथील गावकरी करीत आहेत.