श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बारावी सायन्स उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, राज्य शासनाचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी कृषि आणि संलग्न अभ्यासक्रमांचे प्रवेशासाठी २८ जुलैपर्यंत प्रवेश फॉर्म भरण्यास मुदतवाढ दिली असून, विद्यार्थ्यांना आदित्य फूड टेक्नॉलॉजी, कृषी अभियांत्रिकी जैवतंत्रज्ञान आणि कृषि महाविद्यालय बीड येथे प्रवेश घेण्याची संधी प्राप्त झाली असून, सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरून घेणे ही पालक आणि विद्यार्थी याना निवेदन करण्यात आले.
कोणत्याही विद्यार्थ्याने इतर कोणत्याही अभ्यासक्रमाचा प्रवेश फॉर्म भरला असल्यास (उदा. मेडिकल, इंजिनियर, फार्मसी, नर्सिंग किंवा अन्य) तरीही या सर्व विद्यार्थ्यांनी या कृषि व संलग्न अभ्यासक्रमासाठी आदित्य बी.टेक.फूड टेक. कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि बी.एससी. एग्री हे उच्च तांत्रिक शिक्षण घेण्यास या महाविद्यालयात त्वरित फॉर्म भरून घेण्यास संपर्क करावा अशी माहिती महाविद्यालय चे प्राचार्य श्याम भूतडा यांनी दिली. आदित्य कृषी व संलग्न महाविद्यालयामध्ये नियमित विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासा सोबत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी संलग्नित विविध सरकारी व प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी मिळालेली आहे. तसेच महाविद्यालयाच्या संचालक मंडळांनी कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्र, जैवतंत्रज्ञान या व्यावसायिक शिक्षण सर्व प्रवर्गासाठी मोफत शिक्षण देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी दिली आहे तरी सदरील संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा.