इंग्रजी शिक्षक नसल्याने इंग्रजी शिक्षणा पासून विध्यार्थी वंचित, शासन लक्ष देण्याची मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील एटापल्ली तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या अनेक महिन्यापासून इंग्रजी विषयांचे शिक्षक नसल्याने शाळकरी विध्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून या गंबीर बाबकडे लक्ष शासन की, प्रशासन देणार या कडे लक्ष वेधून आहे.
एटापल्ली येथे स्थानिक व परिसरातील अनेक गावातील विध्यार्थी शिक्षणाकरीता येत असतात परंतु मुख्य इंग्रजी विषयांचे शिक्षक नसल्याने या शाळेत विध्यार्थ्यांवर शोकांतिका निर्माण झाले आहे. या परिसरात जास्त प्रमाणात आदिवासी बहुल असून अधिकाअधिक पेसा क्षेत्रात मोडत असून या शाळेत गेल्या जानेवारी महिन्या पासून इयत्ता ९ वी ते १० व्या वर्गातील विध्यार्थ्यांकरिता शिक्षक नसल्याने विध्यार्थ्यांवर होणारे शैक्षणिक नुकसानाकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न शाळकरी विध्यार्थी व पालकवर्गातून विचारल्या जात आहे.
आदिवासी भागातील विध्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास व्हावा या उद्देशाने शासन विविध उपक्रम राबविले जात असते परंतु एटापल्ली येते जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात चक्क इंग्रजी शिक्षक नसल्याने या विध्यार्थ्यांना इंग्रजी विषयापासून वंचित राहावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व प्रशासन लक्ष देऊन तात्काळ रिक्तपद किंव्हा तासिका तत्वावर पद नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी विध्यार्थी व
पालकवर्गातून केली जात आहे.