राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीमुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उरण – पनवेल मार्गावर एका 22 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आल्याने एकच खळबळ माजली आहे. यशश्री शिंदे असं या मुळीच नाव असून तिच्या छातीवर आणि अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तसेच तिचे काही अवयव कापण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. यशश्री शिंदे या मुलीची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आज पहाटेच्या सुमारास उरण – पनवेल मार्गावर झाडीमध्ये एका तरुणाच्या मृतदेह काही नागरिकांना आढळला. याची माहिती तात्काळ फोनवरुन पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आणि मृतदेह बघून ही केस हत्या करून येथे फेकून देण्यात आल्याचे दिसून येत होते. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी 5 टीम्स तयार केल्या आहेत.
काय आहे हे प्रकरण ? : पोलिसांनी यशश्रीच मृतदेह पोस्टमार्टमसाठी उरणमधील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्यासोबत तिचा प्रियकर देखील गायब झाला होता. यशश्री बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दाखल केली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी उरण – पनवेल मार्गावर यशश्रीचा मृतदेह आढळला. यशश्रीच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने यशश्रीच्या शरीरावर चाकूने वार केले आहेत. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली आहे. या प्रकरणामुळे उरण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तरुण मुलीचा जीव गेल्याने शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणीची हत्या करुन पळून जाणाऱ्या आरोपीचा शोध कधी लागणार, असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे.