हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय मागील रिक्त जागेमध्ये मेडिकल कॉलेज बांधण्याची मागणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र
संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट २८ जुलै:- हिंगणघाटला नियोजित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय मागील ४१ एकर जागेमध्येच झाले पाहिजे या मागणीसाठी दिनांक २७ जुलै २०२४ रोजी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांची छत्रपती संभाजी नगर येथील रामा इंटरनॅशनल पॅलेस येथे भेट घेऊन चर्चा केली व तोडगा काढण्यासंबंधी विनंती करत पत्र सादर केले.
या चर्चेदरम्यान उपजिल्हा रुग्णालय मागील रिक्त जागेचा आराखडा लक्षात आणून दिला दरम्यान शरद पवार यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय मागील रिक्त जागेमध्ये मेडिकल कॉलेज बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पत्र देऊन पाठपुरावा करील असे आश्वासन पवार यांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांना दिले.
दिनांक २२ जुलै २०२४ पासून मेडिकल कॉलेज संघर्ष समिती तर्फे महिलांनी उपजिल्हा रुग्णालय मधील रिक्त जागेचा प्रस्ताव पाठवण्यासाठी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते त्या मागणीला यश आले असून यावेळी वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिंगणघाट येथे बैठक घेऊन तिढा सोडविला.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटला लागून असलेली सरकारी जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी उपलब्ध असताना संबंधित अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल सादर केल्याबाबत तसेच जमिनीचा सातबारा शासनाच्या नावावर असूनही शासनाचा खोटा अहवाल सादर केल्या प्रकरणी महसूल विभागाने संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभाग व औषधी द्रव्य विभाग आजच्या दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ चा शासन निर्णय क्रमांक MED२०२२/ प्र. क्र. २२९ (भाग- ब) /२२/ शिक्षण-१ प्रमाणे वर्धा जिल्ह्याला नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिंगणघाट हे ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलांगित रुग्णालय या प्रयोजनार्थ निशुल्क हस्तांतरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे असा शासनाचा जीआर आहे.
सांस्कृतिक भवनसाठी जागा आरक्षित दाखवुन मेडिकल कॉलेज दुसरीकडे पळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी मेडिकल कॉलेज बांधा, सांस्कृतिक भवनसाठी दुसऱ्या ठिकाणी जागा स्थलांतर करता येते. उपजिल्हा रुग्णालया मागील शासकीय कार्यालयासाठी आरक्षित जागा सांस्कृतिक भवनसाठी हटविण्यात आली. जर हे रिझर्वेशन हटविल्या जाऊ शकते तर अन्य रिझर्व्हेशन का हटवल्या जाऊ शकत नाही हा देखील प्रश्न आहे. उपजिल्हा रुग्णालय लगत मोकळ्या जागेमध्ये मेडिकल कॉलेज बांधण्याचा विरोध का? असा देखील प्रश्न जनतेमध्ये उपस्तीत होत आहे. उपजिल्हा रुग्णालय लगत शासकीय जागेवर मेडिकल कॉलेज न होऊ देण्यासाठी हे सर्व कारस्थान रचले जात आहे.
त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटला लागुन असलेली पुरपीडीत ले-ऑउटची खाली शिल्लक असलेली जागा, म्हाडाची खाली असलेली जागा, नगर पालीकेच्या आरक्षित जागा, वॉल कपांऊडची बांधलेली ट्रॅक, क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन इत्यादी जागेचे आरक्षण रदद करून शासकीय मैडीकल कॉलेजसाठी मोकळी असलेली सर्व जागा आरक्षित करून मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी त्यावेळी आंदोलनकर त्यांचे वतीने करण्यात आली आहे. त्याप्रमाणे भविष्यातील मेडीकल कॉलेजच्या एक्सटेशनसाठी पिंपळगाव रोडवर जागा आरक्षित आहे तरी भविष्यात शासकीय मेडीकल कॉलेजसाठी लागणरी जागा उपलब्ध आहे. जागा शासकीय असल्याने लगेच सरकारला प्रस्ताव पाठुन मंजुरी होऊ शकते आणि लगेच काम सुरू करता येईल तसेच ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने नागरीकांच्या सोईची आहे. पिंपळगाव रोडवर सरकारची असलेली जागा असताना सुध्दा फक्त ०९ एकर जागा उपलब्ध असल्याचा दाखला अविभागीय अधिकारी व तहसिलदार करतात हे बेजबाबदारी पणाचे लक्षणे आहे.असा आमचा आरोप आहे. दबावाखाली उपजिल्हा रुग्णालय लगत शासकीय जागा असतांना खोटे दस्तावेज प्रकाशित करून शासनाची लक्तरे वेशिवर टांगण्याचा प्रकार सरु आहे. याची सरकारने दखल घ्यावी.
महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत दि.०५ फेब्रुवारी २०२४ च्या जीआर नुसार सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलग्नित रुग्णालय या प्रयोजनार्थ निःशुल्क हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तरी शासनाचे निर्देशाप्रमाणे उपजिल्हा रुग्णालया लगत वैद्यकीय मेडीकल कॉलज बांधण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांची छत्रपती संभाजी नगर येथे भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली आहे.