विद्यार्थीनी बघितली मानव वन्यजीव संघर्षाची सत्य कथा.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा २९ जुलै:- आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील इको क्लब व आदर्श हायस्कुल येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने जागतिक व्याघ्र दिना निमित्ताने राजुरा परिक्षेत्रातील आर टी १ या वाघावर आधारित तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सारिपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापक आदर्श हायस्कुल, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक शाळा, वर्गशिक्षक जयश्री धोटे, विकास बावणे, वैशाली टिपले आदींची प्रामुख्याने उपस्थित होते.
वाघाला भ्रमंती करीत भरपूर जागा लागते. शेती, अतिक्रमणे आणि मोठ्याप्रमाणात जंगलतोमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र सर्वच देशांत कमी होत गेले आहे. बदलत्या हवामानाचा फटका वाघानाही बसत आहे. अद्यापही वाघाची चोरटी शिकार आणि तस्करी होतच आहे. सामान्य माणूस आणि वाघ यांच्यामधील दरी कमी होणे आवश्यक आहे. भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणमुळे त्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे वन्य साखळीतील जीवांमध्ये वाघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. असे मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना इको क्लब विभाग प्रमुख यांनी केले. प्रास्ताविक मुलींची प्रतिनिधी अनुष्का रवींद्र वांढरे हिने केले. राजुरा येथील जोगापूर जंगल व परिसरात धुमाकूळ घातलेल्या आर टी १ या वाघावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संकल्पनेतुन ही वास्तववादी सत्यकथेवर आधारित चित्रफीत आहे. यामध्ये वाघाने घेतलेले मनुष्य व जनावरांचे बळी, मानवी चुका, आर टी १ वाघाला पकडण्यात वनविभागाला कसे यश आले, गावकरी वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्यातील संवाद व जनजागृती याविषयीची सविस्तरपणे माहिती यात दिलेली आहे.