आर्ट ऑफ लिविंग, रोटरी क्लब व राजुरा व्यापारी असोसिएशनचा संयुक्त आयोजन. दैनिक व साप्ताहिक सुदर्शनक्रिया दररोज सकाळी सुरूच.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा ३० जुलै:- आर्ट ऑफ लिविंग राजुरा, रोटरी क्लब राजुरा व व्यापारी असोसिएशन राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन क्रिया, ध्यान, प्राणायाम व योग या संबंधिचे शिबिर दि. 23 ते 28 जुलै दरम्यान धनोजे कुणबी सभागृह येथे पार पडले. या शिबिराला मुख्य प्रशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिविंगचे ओमप्रकाश गुप्ता तर सहकारी म्हणून आनंद पाटील , कल्पना भोयर, नीता राऊत यांचे सहकार्य लाभले होते.
या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारचे योग, प्राणायाम व दैनिक व साप्ताहिक सुदर्शनक्रिया कशी करायची या बद्दलची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली. जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे आपले आरोग्य असून तेच चांगले नसेल तर आपल्याकडे लाखो करोडोची संपत्ती असूनही ती उपयोगाची नाही. आरोग्यासोबत आपल्याला मानसिक शांती सुद्धा महत्त्वाची आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या सर्वांवर मात करून मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवायचे याबद्दलचे प्रशिक्षण या शिबिरात ओमप्रकाश गुप्ता यांच्या वतीने दिल्या गेले. या शिबिरात राजुरा शहरातील व्यापारी व गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिराच्या यशस्वीते करिता रोटरी क्लब राजुरा चे अध्यक्ष सारंग गिरसावळे, व्यापारी असोसिएशन राजुराचे अध्यक्ष संदीप जैन, सदस्य कमल बजाज, किरण ढुमणे, किशोर हिगांने, राजू गोखरे, नवल झंवर, आनंद चांडक, बादल बेले, अमोल कोंडावार, विनोद चेन्ने, राजूभाऊ खोब्रागडे, अशपाक बंदाली, गोविंद साबनानी, गजानन कुलकर्णी, लोकेश होकम, राहुल अवधूत, सुबोध डाहुले, रमेश सारडा, प्रतीक बोबडे, वैशाली हिंगाने, राधा ढुमणे, पूनम गिरसावळे, अर्पणा बजाज, प्रणाली खनके, अंजली गुंडावार, माधुरी साळवे, संध्या चांदेकर, लीना प्रतापवार, अनिल येगीनवार, स्वतंत्रकुमार शुक्ला, राकेश करनेवार, मनोज तेलीवार, उमा गंपावर, राजश्री उपगल्लावार, समीर उपगल्लावार, सत्यपाल साळवे, स्वाती गंपावर, भारती कोंडावार यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
या शिबिराची सांगता झाली असली तरीही सर्व शिबिरार्थी दररोज नियमितपणे सकाळी सहा ते साडेसात वाजेपर्यंत धनोजे कुणबी सभागृह राजुरा येथे सुदर्शनक्रिया ,योग,ध्यान, प्राणायाम चा सराव करणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.