आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.30:- वर्धा जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेली एकुण 76 पुरुष होमगार्डची पदे भरण्यासाठी दि. 23 ऑगस्ट पासुन सकाळी 7 वाजता पोलिस मुख्यालय येथे होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दि. 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
होमगार्ड नोंदणीचे ऑनलाईन अर्ज, माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यात महिलाकरीता जागा रिक्त नसल्याने महिला उमेदवारांनी अर्ज करु नये, उमेदवारांची संख्या जास्त असल्यास त्यांची दिनांका नुसार विभागणी करुन मैदानी चाचणी पुर्ण केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी होमगार्ड नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रासह दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत उपस्थित राहावे. नमुद वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचा नोंदणीसाठी विचार केल्या जाणार नाही. नोंदणी दिनांकापर्यंत रिक्त जागेचा अनुशेष वाढल्यास नाव नोंदणी मधुन अनुशेष पुर्ण केला जाईल. असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी कळविले आहे.