अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- शहरातील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आधार सेंटर वर जन्म दाखला नसल्यास शाळेतील टी.सी घेऊन आधार कार्ड अपडेट करण्यात यावे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जन्म दाखला हा शक्तीचा करण्यात आले आहे. जन्म दाखल्याशिवाय आधार कार्ड अपडेट होत नाही. जन्म दाखला नसल्यास शाळेची टी.सी हा पर्याय देण्यात यावे.
आर्वी शहरातील बरेच नागरिकांना आपला जन्म कुठे झाले व कोणत्या दिवशी झाले हे माहीत नसल्यामुळे ते जन्म दाखला आणू शकत नाही. जन्म दाखला नसल्यामुळे आधार कार्ड अपडेट होत नाही. जर आधार कार्ड अपडेट झाले नाही तर जवळपास सर्व कामे बंद होतात. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावे लागते. जन्म दाखला नसलेल्या व्यक्तीचे शाळेतील टी.सी वरून आधार कार्ड अपडेट करण्याची मुभा द्यावी. जेणेकरून संबंधित नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाचे प्रतिलिपी आमदार दादाराव केचे आर्वी विधानसभा तसेच खासदार अमर काळे वर्धा जिल्हा यांना देण्यात आले आहे. हे निवेदन देते वेळेस दर्पण टोकसे, ज्ञानेश्वर राठोड, नितीन आष्टीकर, आनंद वंजारी, अबरार खान, प्रवीण शर्मा, गुड्डू पठाण, संकेत थुल, सुहास ठाकरे, प्रवीण काळे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.