राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गाडगेबाबा चौक ते नदी कडे जाणारा मार्गांचे दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन. मुख्याधिकारी यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत रस्त्यांच्या कामाला केली सुरुवात.
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील स्वामी विवेकानंद वार्ड, गाडगेबाबा चौक येथे रस्त्यांच्या विविध समस्या आहेत. शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने सतत यावर रहादारी सुरु असते. तसेच संतोषी माता मंदीर ते अनिस यांच्या दुकानापर्यंत सिमेंट रस्त्याचे हाल झाले आहेत. गाडगेबाबा चौक येथील समोरील रस्त्याचे बेहाल झाले आहे. समोर गणपती उत्सव, नवरात्रो महोत्सव असल्याने विसर्जन करिता याच रस्त्याने जावे लागते.तसेच या मार्गावर स्मशानभूमी असल्याने याच मार्गाने अंत्ययात्रा सुद्धा नेण्यात येते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच आठवडी बाजार येथील राष्ट्रवादी चौक ते डांगरी वॉर्ड येथील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून रस्त्यावरील डीपी हटवा यामागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिले. या मागणीची मुख्याधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेव गौळकार, शहराध्यक्ष बालु वानखेडे, अल्पसंख्याक प्रदेश सचिव मोहम्मद अजानी, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोत,सुनील भुते, परम बावणे, जावेद मिर्झा, महिला शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, सुजता,जांभुळकर, सुनिता तांमगाडगे, अजय पर्बत,पुरुषोत्तम कांबळे,अहमद खान पठाण, अनिल लांबट,नदीम भाई,नितीन भुते,हेमंत घोडे,कुणाल येसबंरे,बबलू शेख,देवा शेंडे, रंजित भोमले प्रशांत एकोणकर,परम बावणे, बच्चू कलोडे, सुशील घोडे,शेखर ठाकरे,भूषण मुडेवार, सोहेल खान, शंकर, मोरे, कार्तिक बेतवार, नदीम अली, मोहम्मद शाहिद,पंकज भट्ट, विपुल वाढई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.