मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या करिता विधानसभा क्षेत्र निहाय समीती स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तरि या करिता जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार या कमिटी मध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्राकरिता सदस्य म्हणून पदसिद्ध अध्यक्ष विभागाचे आमदार समीर कुनावार, तसेच अशासकीय महिला सदस्य म्हणून हिंगणघाट नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.शुभांगी सुनिल डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शुभांगी सुनिल डोंगरे ह्या तिन वेळा हिंगणघाट नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. अभ्यासु व उच्चशिक्षित शिक्षण सभापती तसेच बांधकाम सभापती अश्या विविध पदावर नगर पालिका श्रेत्रातील काम करताना भाजपा महामंत्री पदांची जबाबदारी व्यवस्थीत सांभाळीत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच या नियुक्ती मुळे हिंगणघाट श्रेत्रातील महिलांना मुख्यमंत्री लाडकि बहीण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळल अशी आशा पल्लवित झाल्या आहे. या नियुक्ती संदर्भात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
यावेळी शुभांगी सुनिल डोंगरे यांनी या नियुक्तीचे श्रेय जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार समीर कुनावार, जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी नगराध्यक्ष प्रेम बंसतानी, जिल्हा कोषाध्यक्ष भुपेद्र शहाणे, जिल्हा जेष्ठ नेते रमेशराव धारकर, कोषाध्यक्ष जिल्हा महामंत्री आकाश पोहाने, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, विधानसभा प्रमुख संजय डेहने, जिल्हा उपाध्यक्ष किरन वैद्य, शहर अध्यक्ष भुषण पिसे, कार्याध्यक्ष संजय माडे, जेष्ठ नेते शंकर मुंजेवार, रमेश टपाले, सुनिल डोंगरे, आशिष पर्बत, रवी उपासे, चंद्रकांत मावळे, महीला जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते, जिल्हा महीला सरचिटणीस अनिता माळवे, विधानसभा महिला प्रमुख नलीनी सयाम, महिला शहर अध्यक्ष रविला आखाडे, कौसर अंजुम, युवामोर्चा अध्यक्ष सोनु पांडे, माजी नगरसेविका शारदा पटेल, सुनीता मावळे, वंदना कामडी, पदमा कोडापे, धनश्री वरघने, वैशाली सुरकार, वैशाली पालांडे, माजी नगरसेवक अमन काळे, नरेश ईवनाते, सोनु गवळी, राजु कामडी, राकेश शर्मा, राजेश जोशी, दिनेश वर्मा, देवा पडोळे, तुषार हवाईकर, पंकज देशपांडे, रवि रोहनकर, संजय नेरहोत्रा, देवा कुबडे, सौरभ पांडे, अतुल नंदागवळी, गुड्डू शर्मा, कैलास भोयर, अनिल मुन, संजय मगर, पंकज त्रिपाठी, मुन्ना त्रिवेदी, गौरव तांबोळी, मोहन तुमडाम, सनी बासनवार तसेच पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले.