हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि.30 जुलै राज्याचे वने, मस्त्य व्यवसाय व संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस विसापूर भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा कार्यकर्ते विसापूर संदीप पोडे मित्रपरिवार तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकडी व वस्ती विभागात विसापूर येथील सर्वच विद्यार्थ्यांना बुक, पेन व चॉकलेट वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, भास्कर गिरडकर, अशोक भोयर, मनोज सदराणी, सेनपती पोटे, मिथिलेश पान्डे, मुरलीधर रोहनकर यांचा मार्फत साहित्य वाटप करून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवा भाजपा कार्यकर्ते सौरभ गिरसावळे, नितीन पादे, आकाश गिरडकर, अतिश गिरडकर, आकाश तिमंडे, विपुल गौरकर, हर्षद पंदीलवार, मयूर पंदीलवार, प्रफुल दिवशे, गौरव कष्टी, चेतन पाल या सर्व भाजपा कर्यकर्त्यांचे उपस्थिती सुंदर असा कार्यक्रम पार पढला