रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मा. नगरसेवक बाबुराव हिवाळे यांच्या प्रमूख मार्गदर्शन लाभले परतूर येथील प्रमूख पाहुणे आणि मान्यवर यांनी जयंती मध्ये उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची सोभा वाढवली सर्व मान्यवर यांनी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती निमित्त अभिवादन केले.
यावेळी परतूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी मा. नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सकाळी 10 वाजता साठे नगर सभागृह येथील ध्वजारोहण संपन्न झाले असून लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थान प्रा.नंदाताई लोखंडे यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण भैया जेथलिया, बाबुरावजी हिवाळे नगरसेवक, राजेश खांडेलवाल नगरसेवक, नाना राखे नगरसेवक, प्रकाश चव्हाण नगर सेवक, डॉ. नवल सर, दीपक कदम, महेश भैया नळगे, बळीराम हिवाळे, कृष्णा कारके, प्रधान अशोक पूरुळे, संजय खणपटे, राजु गायकवाड, अजय कांबळे, गोविंद हिवाळे यांच्या उपस्थितीत
व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होताच जेवणाचा कार्यक्रम 2 वाजल्या पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत साठे नगर सभागृह येथे चालू होता त्यानंतर 6 वाजता डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात सुरवात झाली.
त्याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून नितीन भैया जेथलिया, माधवराव कदम, परतुर पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांची प्रमुख उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुक यशस्वी शांततेत पार पाडण्यासाठी जयंती समिती पुढीलप्रमाणे कार्यरत होती. अध्यक्ष गणेश लालझरे, उपाध्यक्ष अनिल पांजगे, सचिव सतीश कारके, कोषाध्यक्ष संतोष पूरुळे सदस्य, आकाश घोडे, नामदेव राक्षे, सुमित हिवाळे, बरून हिवाळे, विशाल नाटकर, अशोक पाटोळे, अरुण हिवाळे, रोहित हिवाळे, नितीन कांतीराम हिवाळे, अमोल पिंपळे, राहुल साठे, अशोक घोडे, राहुल गवारे यांची उपस्थिती होती.