हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील अल्पसंख्याक युवा युवक यांचा अनेक कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पक्ष प्रवेश केला.
यावेळी सैयद फारुख (राजा), सैयद अजगर अली, वसीम पाशा, शेख अकिल, आदिश, आदियान पाशा, शेख फैजान, दिनेश मुळे, नाझीम शेख व मोकिम अन्सारी यांनी पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी कामगार नेते आफताब भाई खान, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक डॉ निर्मेश कोठारी, शहर अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग अशरफ पठाण उर्फ शेरा, महाराष्ट्र प्रदेश महासचिव हुमायू मिर्झा उर्फ पाशू, शहर प्रमुख महा संघटन सचिव हुसेन खान, शहर संघटन सचिव शेख सलमान यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्ष प्रवेश.