हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- माऊंट इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थी मंत्रिमडळचा पदग्रहण सोहळा माऊंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या हॉल मध्ये घेण्यात आला. विद्यार्थांना जीवनातच शाळेचे नेतृत्व कसे करावे आणि मतदानाचे महत्त्व कळावे या करिता विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक लढविण्यात आली. प्रत्येक उत्साही उमेदवार विविध पदासाठी लढले. त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि जाहीरनामे प्रदर्शित केले. मतदान प्रक्रियेत प्रभावी मतदान झाले, यावेळी विध्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले. मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांचा भव्य शपथविधी सोहळा झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शैलेश झाडे सरांनी विजयी विध्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांना शाळेच्या प्रगतीसाठी चांगले काम करण्यास प्रोत्साहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूरचे अध्यक्ष पांडुरंग जरीले यांनी उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित विध्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मनमोकळे पणाने भाषणं केले व आपल्या शाळेच्या प्रगती साठी हातभार लावण्यास आपली भूमिका स्वीकारली. यावेळी या सोहळ्याला शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
खालील प्रमाणे विध्यार्थी परिषद गठीत करण्यात आली. त्यात शाळेचा मुख्य विध्यार्थी (हेड बॉय) म्हणून गितेश देवतळे, शाळेची मुख्य विध्यार्थीनी (हेड गर्ल) म्हणून कु. सायली कांबळे, शाळेचा सहायक विध्यार्थी (असिस्टंट हेड बॉय कार्तिक वांढरे, शाळेची सहायक विद्यार्थिनी (असिस्टंट हेड गर्ल) कु.श्रेया रामटेके यांची निवड झाली. तर कॅबिनेट सदस्यांची नावे १) गडद हिरवा गट:- सामर्थ केशकर, कु.राशी लोहे २) फिकट हिरवा गट:- दक्ष वाघमारे , कु.परिषका धाबर्डे ३) गुलाबी गट:- अयान पठाण, कु. रुची खैरे ४) निळा गट:- ईशान दुधे, कु. जान्हवी दासरिया वर्ग प्रतिनिधी १) इयत्ता पहिली:-तेजस आडपेवार, कु. आराध्या वेलमे २) इयत्ता दुसरी:- कु.हेजल तिरपुडे ३) इयत्ता तिसरी:- लक्ष कांबळे. कु. गुणगुण जुंपलवार ४) इयत्ता चौथी:- ओम खेंगर, कु. मानवी दोरशेट्टीवार ५) इयत्ता पाचवी:- फैज पठाण, कु.सौम्या दासरिया ६)इयत्ता सहावी:- वंश झाडे, कु.आराध्या कांबळे ७)इयत्ता सातवी:-पूर्वांश शेंडे, कु.जिविका खोब्रागडे ८)इयत्ता आठवी:- योगी कांबळे, कु. साची जाधव ९) इयत्ता नववी:- कार्तिक वांढरे, कु. आयुषी फुलझेले १०)इयत्ता दहावी:- गितेश देवतळे, कु. अफशा शेख यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित विध्यार्थ्यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अथक परिश्रम करण्याचे वचन दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि समर्पण आणि उत्कनटेने जबाबदारी पार पडण्याचे आवाहण केले. माऊंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवनिर्वाचित परिषदेची सुरुवात झाली आणि विध्यार्थ्या नी जबाबदारी हाताळण्याची भूमिका स्वीकारली.