हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:– काही दिवसांपासून शहरातील गांधी चौकात मालू यांचे कापड दुकानात काही आरोपींनी पेट्रोल बॉम्ब टाकुन बॉम्बस्फोट केला होता. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीचा शोध मोहीम राबविली त्यात घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. सुरज गुप्ता याने दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकला होता. या प्रकरणात बॉम्ब टाकणारा आरोपी संजय गुप्ता हा फरार झाला होता.
फरार झालेला आरोपी नागपुरात लपून असल्याची बातमीदारांकडून माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक ममक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपुर पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले. नागपूर शहरातील धरमपेठ परिसरात सापळा रचून पोलीस निरीक्षक असिफ राजा शेख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, एएसआय गजानन डोईफोडे, मेघा आंबेकर, कल्याणी पाटील यांनी सापळा रचून पकडले.