आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- डॉ. उमेश वावरे (वैज्ञानिक) हे हिंगणघाट मधील उच्चशिक्षित समाजसेवक असून ते सामाजिक बांधिलकी म्हणून हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात अनेक समाज उपयोगी उपक्रम घेत असतात. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता ८ ते १० मधील सावली (वाघ) येथील विद्यार्थी यांचा मेडल व शिल्ड देऊन त्यांनी सत्कार केला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र फडकाळे, शालिक एकोणकर, गोकुळ एकोणकर, देविदास सोनटक्के, प्रकाश कुकडे, तसेच लोकसेवा विद्यालय मधील शिक्षिका नवघरे मॅडम आणि रूग्णसेवक रोशन बरबटकर उपस्थित होते. याप्रसंगी अक्षय वानकर, अक्षय नवघरे, बंटी भोयर, सारीका मानकर, निलेश मानकर, गजु कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गुणवंत विद्यार्थी उन्नती पावडे, सानिध्या मानकर, आदेश दानें, सुशांत वसाके, प्रियांशी पांडे, माही कुडे, आर्यन मानकर, अंकित देवतळे, अर्जुन ठक, श्रावण देवळकर, वेदांत अवथळे, साहिल मन्ने, तन्मय तिखट, लकी कुकडे, नैतिक एकोणकर, कृष्णा एकोणकर, हर्षल पिपंरे, खुशाल विटाळे, समीक्षा भोयर, कनक पावडे, पूर्वी ठक, तेजस मडावी यांचा मेडल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावकऱ्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखविली, तसेच या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा सुद्धा केली.

