पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी व भाजपा आघाड्यांची संघटनात्मक बैठक नागपुर येथील भाजपा कार्यालय महानगर गणेश पेठ येथे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोक नेते, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष संजय गाठे, ओबीसी नेते तथा समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, प्रदेश भाजपा सचिव धर्मपाल मेश्राम, आमदार डॉ.देवराव होळी, तसेच भाजपा पदाधिकारी व आघाडयांसह नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणूकी सह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.