अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे महावीर वार्ड हिंगणघाट येथे एका पांढ-या रंगाच्या XUV 500 कार क्र. MH 43 AR 5153 यावर सापळा रचुन दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, सदर कारमध्ये 06 खरर्ड्याचे खोक्यात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने, सदर दारूचा मुद्देमाल व दारू वाहतुकीकरीता वापरण्यात आलेल्या कारसह 11,01,600 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी पोलिसांनी आरोपी नामे अनिल पावडे रा. महावीर वार्ड हिंगणघाट 2) भारत चद्रकांत उंन्डे, वय 34 वर्ष, रा. रंगारी वार्ड हिंगणघाट, 3) दिक्षीत उर्फ घुटली मिलींद भगत, वय 25 वर्ष, रा. संत तुकाडोजी वार्ड हिंगणघाट, 4) राजु अन्ना कंदुकुरी देशी दारू दुकानदार रा. चिन्नोरा तह. वरोरा 5) आकाश उर्फ टिन्या गवळी रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, अभिषेक नाईक, विनोद कापसे यांनी केली.