पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट ४, पुणे शहर
दिनांक १९/०९/२०२२
यातील फिर्यादी है जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे येथुन जात असताना, सुधिर गवस, रुपेश अडागळे व एक विधी संघर्षित बालक यांनी आपापसात संगनमत करुन, पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून, फिर्यादीस जीने तार मारण्याच्या उद्देशाने सुधिर गवस थाने फिर्यादीचे डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून व इतरांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून दुखापत केल्याने त्यांचेविरुद्ध येरवडा पोलीस ठाणे गु.र.न. ४४८/२०२२. भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) म.पो. का. कलम ३७ (१) सह १३५. क्रिमीनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांचेविरुद्ध मारहाणीचे व मालमत्ता चोरीचे गुन्हे यापुर्वी
दाखल आहेत. तसेच सुधिर चंद्रकांत गवस यांस दोन वर्षाकरीता तडीपार केले असतानादेखील सदर
आदेशाचा भंग करून त्याने वरीलप्रमाणे गुन्हा केला आहे.
नमुद गुन्हयाचा तपास करीत असताना बातमीदाराकडुन माहिती मिळाली की नमुद आरोपी है महाराष्ट्र गोवा सिगेवरील दोडामार्ग भागात पळून गेले आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक गणेश गाने व तपास पथकाने गिळालेल्या माहीतीचे ठिकाणी सापळा रचुन आरोपी नागे १ ) सुधिर चंद्रकांत गवस, वय २३ वर्षे, रा. स.नं. १०३, माऊली चौक, जयप्रकाश नगर, येरवडा, पुणे २) रुपेश दिलीप अडागळे, वय २४ वर्षे, रा. स.नं. १०३, माऊली चौक, जयप्रकाश नगर, येरवडा पुणे व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयाचा तपास येरवडा पोलीस ठाणे हे करीत असून, दोन आरोपीतांना व एक विधीसंघर्षित बालकास पुढील कारवाईकामी येरवडा पोलीस ठाणे पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णी, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ कडील पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील व पोलीस अंमलदार, महेंद्र पवार, हरीष मोरे, नागेश कुँवर, सारस साळवी विठ्ठल चाव्हळ, प्रविण भालचिम, रमेश राठोड यांनी केली आहे.