जिल्हाअध्यक्ष पदी देविलाल तायडे तर महासचिव दिवाकर गवई यांची निवड
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राष्ट्रीय पक्ष होऊ शकला नाही कारण बाबासाहेबांचे आयुष्य यासाठी तोकडे पडले. नंतर येणारे नेते त्यांची उंची गाठू शकले नाहीत. जर बाबासाहेब असते तर त्यांनी दलितेतर लोकांना या पक्षात आणले असते कारण त्यांची व्हिजन मोठी होती आणि त्यांचे कर्तृत्व मोठे होते. पक्षाच्या नावातच हे दिसून येते. त्यांचा आवाका मोठा होता. जर ते अजून दहा वर्षे जगले असते तर त्यांच्या ज्ञानाचा देशाला फायदा होऊन लोक आणखी त्यांच्या पक्षाकडे आकर्षित झाले असते. पण तसे न झाल्यामुळे रिपब्लिक पक्ष एक डबके म्हणून राहिला. त्यांचे कार्य अधुरे राहिले. म्हणून हे त्यांचे अधुरे कार्य पुर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु डॉ. राजरत्न आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करून देणार आहेत असे प्रतिपादन शासकीय विश्रामगृह अकोला येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नव्याने संघटित करून बौद्धांना राजकारणात आपले स्थान पक्के करून घेण्यासाठी आज या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची मुहूर्तमेढ अकोला येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रोवण्यात आली. शासकीय विश्रामगृह अकोला येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्हाध्यक्ष देवीलालजी तायडे. महासचिव दिवाकर गवई, महानगर अध्यक्ष सुनील सिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद तेलगोटे,जिल्हा सचिव यशवंत तेलगोटे, जिल्हा सचिव जितेन्द्र अहीर, जिल्हा सदस्य नंदरत्न खंडारे,जिल्हा सदस्य राजेश समदुरे, महानगर महासचिव प्रा. राहुल इंगळे, महानगर उपाध्यक्ष साहेबराव इंगळे, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे, अध्यक्ष रिसोड विधानसभा मतदारसंघ अजाबराव सरदार यांची निवड करण्यात आली. डॉ राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते साहेब व प्रदेश महासचिव वैभव ढबडके यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ अरूण चक्रनारायण व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये काम करण्यासाठी बौद्ध समाजातील इच्छुकांची तौबा गर्दी होती.