मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजाराम (खां):- जागतिक आदिवासी दिनानिमित्त राजाराम येथील गोंड राजे संग्रामशहा यांना प्रतिमेला अभिवादन करून आदिवासी समुदायाचे प्रतीक मानले जाणारे सप्तरंगी ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी आदिवासी समुदायाचे आराध्य दैवत पहंदी पारी कुपार लिंगो, क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या प्रतिमांना दिप प्रजवलन व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक चंद्रा आलाम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, राजारामचे उपसरपंच रोशन कंबगौनीवार, सदस्य रमेश पोरतेठ, सतीश सडमेक, सूर्यकांत आत्राम, मोहन वेलादी, मुत्ता पोरतेठ, दीपक अर्का, विनोद सिडाम, बि. वाय. सोयाम, मु.अ.बासनवार, पठाण तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

