विकासाकडे लक्ष देण्याची मागणी पत्रकातून केली आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फॉरेस्ट गार्डन रोड खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे नूतनीकरण (बांधकाम) करण्यासाठी सहा कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. अनेकदा मागणी करूनही निधी देण्यात आली नाही. सिरोंचा नवीन बसस्थानक बांधकाम निधी अभावाने काम कासव गतीने सुरू आहे. सिरोंचा येथे स्वतंत्र बसडेपो (बसआगार) मंजुरीचे प्रस्ताव प्रलंबित आहे. आलापल्ली ते सिरोंचा रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. या हायवेचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणार्या कंत्राटदारां विरुद्ध कारवाई करण्यात आली नाही.
सिरोंचा नारायणपुर जुन्या रस्ताच्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला निधी उपलब्ध करून दिले नाही. काम उर्वरित असल्याने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या धनाचे बिल बनवून रक्कम देण्यात आले नाही. भोंगळ कारभारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. 132kv विद्युत टावर लाईनचे काम मागील पाच वर्षीपासून कासवगतीने सुरू आहे. काम पूर्ण व्हायला किती वर्ष लागणार हे कुणास ठाऊक नाही. कोनसरी अहेरी (वडलापेठा) च्या धर्तीवर सिरोंचा तालुक्यात लोह प्रकल्पावर आधारित उद्योग उभारण्यात आले नाही.
शासनाकडून सिरोंचा तालुक्यावर दिवसेंदिवस अन्याय होत चालला आहे अश्या अनेक प्रश्नाकडे आणि विकास कामाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यातील मतदार (जनता) आणि बेरोजगार युवक नाराज आहेत. सरकारने विकासात्मक कामे जलद गतीने पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांचे व बेरोजगार युवक, सामान्य जनहिताचे प्रश्न त्वरित सोडविणे गरजेचे आहे. जलदगतीने विकास झालाच पाहिजे. असे विविध समस्यावर सरकारनीं लक्ष देऊन जलदगतीने काम करून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न मार्गी लावावे. असे शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख सत्यनारायण बुर्रावार यांनी पत्रकातून केली आहे.