मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी राज्यातील महायुतीच्या सरकारने या पोशिंदाला संपवण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या प्रयत्नांना राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना जोरकसपने मुकाबला करून राज्यातील शेतकऱ्यांच्या व कृषी पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी भर भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचे राज्य प्रमुख सुधीर पाटील राऊत यांनी केले.
राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेच्या राज्यप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमत वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या सुधीर पाटील राऊत यांनी वर्धा शासकीय विश्राम भवन मध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये वर्धा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून हिंगणघाट चे प्रा.प्रभाकर शंकरराव रेवतकर यांची नियुक्ती पत्र देऊन नेमणूक करण्यात आली. तसेच राज्य प्रमुख सुधीर राऊत व निरीक्षक म्हणून लाभलेले दत्ता चांदोरे व डॉ. त्र्यंबकराव कुरटकर यांना सुद्धा पत्रकार परिषदेत नियुक्ती पत्र दिले. शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक मागण्या यावेळी त्यांनी केल्या.
राज्यातील कृषी पदवीधरा सहितय सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचा असेल असे यावेळी राऊत यांनी सांगितले. ही संघटना शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत आहे अशा परिस्थितीत नैसर्गिक व्यवस्थापनावर काम व्हायला हवे आणि पिक विमा योजनेचे स्वरूप सुधारले पाहिजे , सामनातून आयोगाच्या अहवाला ची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना आधारभूत किमती ठरवून द्या. आदी मागण्या शासन दरबारी रेटणार असल्याचे सांगितले. या बैठकीत प्रमोद शिंदे, समीर ठाकरे, अनंत झाडे, अनंत साठवणे, मनोज साठवणे , प्रजय रेवतकर, बालू देशमुख, शेखर शेंडे, दिनकरराव तेलहांडे, किशोर पिसे, श्रीराविष काकडे, गणेश सरोदे, सतीश महाबुदे आदी मान्यवर उपस्थित होते.