अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील खड्डे तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत दिनेश वाघ अध्यक्ष विदर्भ विकास आघाडी यांच्या नेतृत्वात तहसीलदार योगेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील वडनेर टोल नाका समोरील वडनेर ते येरला या मार्गावर मोठ्या प्रमाणात जीव घेणे खड्डे असून वारंवार तोंडी तक्रारी केल्या नंतरही कुठल्याही प्रकारचे दुरुस्तीचे कामे झालेले नाही. या खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान होत आहे तसेच जीवित हानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बऱ्याच लोकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. सदर रस्ते दुरुस्ती होईपर्यंत सदर टोल नाक्यावरील टोल बंद करण्यात यावा व तात्काळ रस्ते दुरुस्तीचे कामे करण्यात यावे, अन्यथा स्वातंत्र्य दिना पासून सदर टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन विदर्भ विकास आघाडीचे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी केलेले आहे. तसेच याबाबत निवेदन नायब तहसीलदार हिंगणघाट यांना दिलेले आहे.