मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वंदना सवरंगपते यांनी आजपासून हिंगणघाटच्या नविन उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्या पूर्वी रामटेक जिल्हा नागपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांनी यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील उपविभागीय अधिकारी पदावर काम केले आहे. श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या बदलीनंतर हा बदल झाला आहे.
आज सकाळी पदभार स्वीकारताना वंदना सवरंगपते म्हणाल्या, हिंगणघाटच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी मी अथक परिश्रम करण्यास कटिबद्ध आहे. मी लोकांच्या गरजांना प्राधान्य देईन आणि समाजात सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.
यावेळी योगेश शिंदे तहसिलदार, सागर कांबळे नायब तहसिलदार तसेच अधिकारी, स्थानिक नागरिक आणि राजेश कोचर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.