प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये डीबीटीव्दारे सबसिडी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या संबधित गॅस एजन्सी मध्ये बँक पासबुक आणि आधारकार्डसह जावून ई-केवायसी करण्याबाबत आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.