युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्टीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचे मार्गदर्शनाने पत्रकार भवनाचे अनावरण.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येते वृत्तपत्र सृष्टीचे जनक आध्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच पेरमिली परिसरातील 60 गावातील नागरिकांच्या समस्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन सोडविणे करिता पेरमिली येथील ग्रामपंचायतीला दोन वर्षापूर्वी पत्रकार संघटनेच्या माध्यमातुन निवेदने देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत पेरमिली ग्रामपंचायतीने ठराव पारित करून वनविभागाला जागे संदर्भात पाठपुरावा केला. त्या अनुसंगाने तसेच स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण पत्रकार संघटना माध्यमातून अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील लोकशाही पत्रकार संघटनेच्या पत्रकार भवनाच्या जागेचे व फलकाचे अनावरण करण्यात आले आहे.
यावेळी पेरमिली गावचे सरपंच श्रीमती.किरणताई नैताम यांच्या हस्ते जागेचे भूमिपूजन करण्यात आले.तर पेरमिली चे उप पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पवन नायमने यांच्या हस्ते जागेच्या फलकाचे पीत कापून अनावरण करण्यात आले.
लोकशाही पत्रकार संघटनेचे पत्रकार भवन हे परिसरातील 60 गावातील पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन सोडविणे करिता सोयीस्कर होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील परिसरातील प्रेरणा देणारे ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन ठरतील व वारसा पुढे चालवन्यासाठी विकासात्मक कार्यकर्तुत्वाची ऊर्जा टिकवणे हा आपला धर्म आहे असे उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाला पेरमिली गावाचे सरपंच किरणताई नैताम, प्रभारी अधिकारी पवन नायमने,माजी सरपंच प्रमोद आत्राम, पोलीस हवालदार प्रशांत मेश्राम, पत्रकार डॉ.शंकर दुर्गे, आशिफ खान पठाण, साई चंदणखेडे, श्रीनिवास बंडमवार, श्रीकांत दुर्गे,ज्येष्ठ कार्यकर्ते तुळशीराम चंदनखेडे, रजीता मुळावार, सपना बंडमवार, लतीका दहागावकर, सत्तुबाई येंनप्रेडीवार, गिरजा दुर्ग, अमर गावडे, प्रदीप चिटलवार, अर्जुन मेश्राम, अश्टशिल गर्गम, दर्शन चांदेकर, बंटी गावडे, प्रभाकर जांगिटवार, सनथ चंदनखेडे, ग्राम पंचायतचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेरमिली ग्रामपंचायतीने तसेच गावातील नागरिकांनी पत्रकार भवणाकरिता पुढाकार घेतल्याने पेरमिली सारख्या ग्रामीण व अती दुर्गम भागात पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज होणार आहे. त्यामुळे पेरमिली ग्रामपंचायतीचे सरपंचा किरणताई नैताम यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.