राष्ट्रीय हरित सेना इको क्लब, स्काऊट -गाईड चा संयुक्त उपक्रम.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा तथा आदर्श हायस्कुल येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज स्काऊट युनिट, जिजामाता गाईड युनिटच्या विध्यार्थीनी नागपंचमी निमित्याने सापांबाबत अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती व सापाने चावा घेतल्यास करावयाचे प्रथमोपचार, प्रात्यक्षिकाद्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रतन पचारे, सचिव, जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण संस्था राजुरा यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून मनोज कोल्हापुरे, सदस्य, नेफडो, तथा जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण संस्था, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख क्रीडा मार्गदर्शक बादल बेले, मुलींची प्रतिनिधी अनुष्का रवींद्र वांढरे, मुलांचा प्रतिनिधी जय महेंद्र बुरडकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी विषारी, बिनविषारी, निमविशारी सापांची ओळख, त्यांचे स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, लांबी, त्यांचे वर्णन याविषयी माहिती देण्यात आली. तसेच सापाने चावा घेतल्यास करावयाचे प्रथमोपचार याविषयीं प्रत्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा रेगुंठावार हिने केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी तर आभार अनुष्का वांढरे हिने मानले. यावेळी स्काऊट मास्तर रुपेश चिडे, ज्योती कल्लूरवार,गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, वैशाली टिपले,जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर आदींचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय हरित सेना इको क्लब, स्काऊट गाईड युनिट च्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.