श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आदित्य शिक्षण संस्थेमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले त्याच बरोबर त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भाषण करण्यात आले सुभाषचंद्रजी सारडा यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांनी व्हावे आपले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिंगणे एल डी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा, प्रशासकीय अधिकारी डॉ. संतोष लहाने, अंजली पाटील व सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आपेट सर आदित्य जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कचरे सर फूड महाविद्यालयाचे प्राचार्य प्र भुतडा सर तसेच एग्रीकल्चर इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सानप सर आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सत्कर सर आदित्य फिसिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य बहिरवाल सर आदित्य दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ समीरा कुरेशी मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदित्य फार्मसी महाविद्यालयांच्या मुलीने व कार्यक्रमाची सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आदित्य जैव तंत्रज्ञान महाविद्यालय देण्यात आला तसेच उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार ढोबळे सर व आदित्य दंत महाविद्यालयाचे डॉक्टर समीरा कुरेशी यांना देण्यात आला. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून अध्यक्ष साहेबांच्या हस्ते फूड पायलट प्लांट उद्घाटन करण्यात आले तसेच पॉलिहाऊस मध्ये नवीन प्रकारे कारले या पिकाचे उत्पादन कसे घ्यायचे याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप काठोळे सर यांनी केले