प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळाव्या तसेच सिंथेटीक फ्लोरिंग केल्याने होणारी इजा टाळण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात टेनिस व बास्केटबॉल कोर्टला सिंथेटीक करुन त्याचे लोकार्पण आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.
टेनिस व बास्केटबॉल कोर्टला सिंथेटिक करण्यासाठी सन 2023-24 मधील जिल्हा वार्षिक योजनेतून अनुक्रमे 7 लक्ष व 14 लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. कृष्णकुमार सिंह, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, प्रो. राजेश यादव, क्रीडा मार्गदर्शक बी.एम. चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.