मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिनांक 15 ऑगस्ट:- भारत विद्यालय हिंगणघाट येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू कारवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी बँड पथक आणि संगीत चमुच्या साथीने राष्ट्रगीत, राज्य गीत, जयघोष आणि झंडा गीत यांच्या गायनानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, पर्यवेक्षिका निलाक्षीताई बुरीले, एनसीसी कमांडर किशोर चवरे आणि भारत प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवगिरकर उपस्थित होत्या.
अध्यक्षीय संबोधन करताना शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात थोर पुरुषांचे तसेच क्रांतिकारकांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या त्यागाची, बलिदानाची, समर्पणाची जाणीव आपण सर्वांनी ठेवून राष्ट्राचा विकास कसा साध्य करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी किशोर चवरे यांनी तिरंगा प्रतिज्ञा तसेच तंबाखूमुक्त अभियाना अंतर्गत व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमाचे संचालन मिलिंद सावरकर यांनी केले. या कार्यक्रमाला एनसीसी पथक, स्काऊट गाईड पथक, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक वर्ग तसेच गावातील नागरिक शाळेतील समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.