आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जीतीन रहमान (IAS) यांनी ग्रामपंचायत हळदगाव येथे भेट देऊन गावातील विविध बाबींची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने बायोगॅस संयंत्र असलेल्या घरी भेट देऊन त्याबद्दल माहिती जाणून घेतली, शाळा, अंगणवाडी, व्यायाम शाळा येथे भेट देऊन त्याची पाहणी केली, तसेच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला व तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हळदगाव द्वारे उभारण्यात आलेल्या पाणी संकलन केंद्राची सुद्धा पाहणी केली. त्याचप्रमाणे अंगणवाडीला भेट देऊन तेथील चिमुकल्यांशी संवाद साधला व अंगणवाडीची संपूर्ण माहिती घेतली व त्यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी (पं) डॉ. ज्ञानदा फणसे, ग्रामपंचायत हळदगाव येथील सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, स्था.अ.स., बीआरसी, MSRLM प्रतिनिधी, विभाग प्रमुख तसेच सर्वअधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.