मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट दि.१८:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातील व्हावे यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती, महिला समिती, युवक समिती, सावित्रीच्या लेकी संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलन करून शासन आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्या विरोधात भूमिका घेतली आहे. हिंगणघाट शहरातील सर्व नागरिकांची मागणी आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातील परिसरात व्हावे. पण आमदार समीर कुणावर यांच्या वर संघर्ष समितीने आरोप केला की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातून पळवून नेण्याचा घाट रचला असून एक टक्के लोकांना कसा फायदा होईल आणि आपली राजकीय पोळी शिजणार असे तरी आमदार समीर कुणावर यांच्या भूमिके वरून दिसून येत आहे.
त्यामुळे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती महिला समितीने पत्रकार परिषद घेउन शासन आणि प्रशासन कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती कडून करण्यात येत असलेले आंदोलन दडपणयासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळे वीरूगिरी करून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्या तरुणावर अपराध क्रमांक 1110/24 कलम 223 बिएनएस कलम 135 मपोका अंतर्गत गुन्हे दाखल केल्यामुळे संघर्ष समिती आणि महिला संघर्ष समिती ह्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला.
मुख्यतः खालील मुद्यांवर चर्चा झाली. 1) महिलांवर आणि सुशिक्षितांवर सत्ता पक्षाकडून गुन्हे दाखल करणे ही बाब पूर्णपणे अयोग्य आहे. अशी अपेक्षा आम्हाला सत्तापक्षा कडून बिलकुलच नव्हती. हे गुन्हे लवकरात लवकर निस्तरणात यावे. ह्यासाठी सत्तपक्षाणेच पुढे येऊन आता गुन्हे निस्तरित करण्यास पुढाकार घ्यावा ही आमचे आव्हान आहे.
2) हिंगणघाट येथील नियोजित शासकीय मेडिकल कॉलेज मौजा हिंगणघाट, हिंगणघाट तहसील साठी मंजूर झालेले आहे आणि तो तसा जी.आर.सरकारने काढलेला आहे. तसे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले आहे. त्यामुळे सत्ता पक्षाने दिशाभूल करून वेळा, नांदगाव, जाम, समुद्रपूर असे नावाचे उद्योग करायला नको त्यामुळे हिंगणघाटची सूव्यवस्था चिघळताना दिसत आहे.
3) जनतेसाठी सामाजिक रित्या आंदोलन होत असताना सत्ता पक्षा द्वारे वैयक्तिक रोशातून फक्त काहीच साधारण सुशिक्षित महिला आणी सुशिक्षित लोकांवरच गुन्हे दाखल करणे ही पूर्णपणे चुकीची बाब आहे. संविधानिक प्रकारे आंदोलन करणे हा आमच्या सर्वाचा संविधानिक अधिकार आहे, त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करून ही हिटलरशाही होताना दिसत आहे.
4) एका युवकाने बेरोजगारीला त्रासून पाण्याच्या टाकीवर जाऊन निदर्शने करत असताना आम्ही निदर्शन स्थळी फक्त बघे म्हणून उपस्थित असताना आमच्यावर सत्ता पक्षाच्या इशारावर पोलीस प्रशासनाने आमच्यावर चुकीचे गुन्हे नोंदवलेले दिसते तशी वर्तमान पत्रामध्ये बातमी पण आली आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज साठी चाललेल्या आंदोलनाला थांबण्याचा हा दबाव तंत्राचा प्रयोग दिसतो.
5) आमचे आंदोलन 250 दिवसापासून अविरत प्रमाणे मेडिकल कॉलेज साठी सुरू आहे. आमच्या हातात होता की मेडिकल कॉलेज या ठिकाणी व्हायला पाहिजे त्यावेळेस संधी साधून आमचे संविधानिकरीत्या सुरू असलेल्या आंदोलनाला वापरले गेलेले हे एक दबाव तंत्र आहे असे आम्हाला वृत्तपत्रातून छापून आलेल्या बातमीवरून वरून कळले. त्यामुळे आम्ही हे पत्रकार परिषद घेतली आहे.
6) आमचे आंदोलन वैयक्तिक नसून संपूर्ण हिंगणघाट कराच्या आणि सर्व समावेशक समाजासाठी आहे त्याअंतर्गत आम्ही आमदार समिर कुणावांर ह्यांना आव्हान करतो की आमच्या आंदोलनातील निरागस महिला आणि सुशिक्षित व्यक्तींवर नोंदवले गेलेले चुकीचे गुन्हे पोलिस आणि महसूल प्रशासनाकडून मागे घेण्यास त्यांनी पुढाकार घ्यावा.
ह्या प्रसंगी सुजाता जिवनकार, सुजाता ट्टेंभूर्णे, रागिणी शेंडे, सुजाता जांभुळकर, सुनिता तामगाडगे, चंदा येलेकर, पिंकी रंगारी, सुनील पिंपळकर, अमित रंगारी, राजेश भाईमारे, सुरेंद्र बोरकर, मोनु चौरसिया, विद्या देशमुख, सीमा तिवारी, आचल वकील, ,भरती कावळे, वैशाली बनकर, सुचिता सातपुते, शीला हटकर आणि इतर लोक उपस्थित होते.