उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने नाशिक सातपूर आज दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने कार्बन नाका सातपुर या ठिकाणी रक्षाबंधन व पदग्रहण सोहळा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिनानिमित्त आज बहिण भाऊ ऋण बंधन म्हणून रक्षाबंधन समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती मंदा पवार उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटक व श्रीमती कमल इंगळे नाशिक जिल्हा मार्गदर्शक व सौ. सुनिता केदारे नाशिक शहर उपाध्यक्ष यांनी आयोजित केला होता व मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यांच बरोबर पदग्रहण करताना समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे व सौ.रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष व डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव यांच्या हस्ते विक्रम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख या पदावर निवड व मंदा पवार उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटक या पदावर निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थित दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष व डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव, सौ. रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष हेमत कुलकर्णी मार्गदर्शक ॲड. शिंदे, विक्रम गायकवाड सह ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.