हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- एकीकडे डॉक्टरना देवा प्रमाणे दर्जा दिला जातो मात्र आज खाजगी डॉक्टरची लूट पाहता जन सामन्यात याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, कारणही तसेच आजच्या खाजगी महागाड्या वैदकीय खर्च पाहता गरीब वर्गातील सदस्य हा हतबल होऊन तोकड्या सेवा असलेल्या सरकारी रुग्णालयात धाव घेतो व आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न्य करतो मात्र कधी कधी त्यावेळी संबधीत सरकारीयंत्रणा सुद्धा अपूर्ण सुविधा अभावी रुग्णाचे थातूर मातुर आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करताना आपण नेहमी पाहत असतो मात्र सरकारी रुग्णालयात एका रुग्णाची गंभीर स्थिती पाहता आपले स्वतःचे रक्त देऊन त्याचे प्राण वाचविल्याची प्रेरणादायी घटना चंद्रपूर मेडिकल कालेज ला एमबीबीएस ला शिकत असलेला एका ट्रेनिं डॉक्टर ने केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
यात विस्तृत असे कि चिमूर येथील रोहित बुदेवार वय 24 हा आपल्या मित्रासह दुचाकी वाहणाने चंद्रपूर येथे येत असताना त्याचे तोल जाऊन वाहन स्लिप होऊन पडले दरम्यान दोघांना ही गंभीर दुखापत झाली मात्र रोहितला डोक्याला जबर मार लागल्याने सतत कानातून व डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होता दरम्यान कसे बसे त्याच्या मित्राने त्याच स्थितीत त्याला ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारा करिता घेऊन आला प्राथमिक उपचारा नंतर रुग्णाची स्थिती पाहता त्याला त्वरित एबी निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. एबी रक्तगट हे फार कमी प्रमाणात भेटत असल्याने रक्तासाठी शोधाशोध सृरू केली. मात्र सर्वीकडे शोधाशोध करून सुद्धा रक्त उपलब्ध होत नव्हते व इकडे रुग्णाची प्रकृती अधिकच गंभीर होत होती, तेव्हा मेडिकल कालेज चंद्रपूर येथे एमबीबीएस ला शिकत असलेला सिनियर स्टुडन्ट डॉ. स्पंदन शाहू नारनावरे यांनी स्वतःच त्या गंभीर जख्मी रुग्णाला आपले एबी निगेटिव्ह असलेले स्वतःचे रक्त देऊन त्या रुग्णाचे प्राण वाचविले त्यामुळे डॉ स्पंदन च्या या कार्यामुळे सर्वत्र स्तुती होताना दिसून येत आहे व महत्वाचे म्हणजे डॉ. स्पंदन हा विरूर स्टेशन येथील असल्याने परिसरात तो प्रेरणादायी ठरत असल्याचे बोलल्या जातं आहे.