अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येते प्रकरणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना अमरावती शहरातील सिव्हिल लाईन परिसरात घडली असून. निलेश प्रकाशराव गुजर वय 27 वर्ष रा. मोर्शी असे मृत तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच मृतक निलेश गुजर याने पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती. प्रेमिकांच्या त्रासाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
प्रेमिकेकडून मानसिक त्रास?: मृतक निलेश आपल्या मावशीच्या घरी दर्यापूरात मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास होता. शिक्षण घेत स्पर्धा परिक्षा देखील तो देत होता. दरम्यान शुक्रवारी दि.23 ला कुटुंबातील सर्व सदस्य हे शेगाव येथे होते. घरी कुणी नसल्याने निलेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक निलेशची प्रेमिका त्याला वारंवार पैशांची मागणी करत होती व मानसिक त्रास देत होती, निलेशला आत्महत्या करण्यास त्याच्या प्रेयसीने प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप निलेशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या: शनिवारी निलेशच्या नातेवाईकांनी दर्यापूर पोलीस स्टेशन वर धडक देऊन प्रेमिकेसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दोन तास ठिय्या दिला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चेनंतर प्रकरण निवळले. उपजिल्हा रुग्णालय दर्यापुर येथे नातेवाईकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास दर्यापूर पोलिस करत आहेत.
प्रेमिकेला केला शेवटचा व्हिडिओ कॉल: शुक्रवारी (दि.23) ला सर्व कुटुंब शेगावला दर्शनासाठी गेल्यानंतर मृतक निलेशने आपल्या प्रमिकेला व्हिडिओ कॉल करुन संवाद साधला. दोघांमधील संभाषणानंतर निलेश ने गळफास घेऊन आत्महत्या केली. निलेश आणि त्याच्या प्रेमिकामध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रेमिकेसोबत संपर्क झाल्या नंतरच निलेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

