मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अरिहंत क्रिटिकल केअर डॉ. मारोठी हॉस्पिटल मध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल मरोठी यांचे हस्ते झाले. यावेळी समाजसेवी श्रीमती किरण मूनोत, पी.वी. टेक्सटाईल चे पारस मुनोत, सुभाष निनावे, नानासाहेब खापरे, विजय धात्रक, नितीन कटकमवार, महेश दीक्षित, राजेश कोचर, नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. मरोठी म्हणाले की सिकलसेलच्या रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज पडते, तसेच अपघातग्रस्त रुग्णांना सुद्धा योग्य वेळी रक्त उपलब्ध व्हावे याकरीता तरुण व सुदृढ व्यक्तींनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदा कोठारी तर संचालन पराग मुडे यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार डहाके यांनी मानले.
यावेळी रक्त संकलनाचे कार्य लाईफ लाईन ब्लड बँक च्या डॉ. कीर्ती बांबड व चमुने पार पाडले. शिबिराच्या आयोजना करीता नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.