1164 रूग्णांची आरोग्य तपासणी, 30 रूग्णांना मेजर सर्जरीकरिता आशा हॉस्पीटल येथे पाठविले.
हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथे निःशुल्क महाआरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीरामध्ये 1164 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद आणि समाधान देण्याचे ध्येय उराशी बाळगुन गोरगरीब व कष्टकरी माणसाला देव मानून सेवा केली पाहीजे व हा सेवाधर्म सर्वांनी संवेदनशील अंगीकारला पाहीजे.
दिनांक 25 ऑगस्ट रोजी गांधी शाळा जुना बसस्टॉप बल्लारपूर येथे निःशुल्क महाआरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे आयोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार तथा आशा हॉस्पीटल शंकरा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल नागपूर व सर्जिकल ऑकोलॉजी कॅन्सर केअर सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, कान, नाक व घसा तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, स्त्री-रोग, बाल-रोग, त्वचा-रोग, श्वसन-रोग, दंत व मुख रोग, मानसिक रोग यासारख्या अनेक व्याधींची तपासणी करण्यात आली. यावेळी 1164 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 रूग्णांना मेजर सर्जरीकरिता आशा हॉस्पीटल नागपूर येथे पाठविण्यात आले व इतर रूग्णांवर बल्लारपूर येथे उपचार करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, काशी सिंह, डॉ. मंगेश गुलवाडे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, मनीष पांडे, ॲड. रणंजय सिंह, समीर केने, स्वामी रायबरम, सुवर्णा भटारकर, सतिश कनकम, देवेंद्र वाटकर, राजु दासरवार, छगन जुलमे, राजु दारी, शेख जुम्मन, वैशाली जोशी, कांता ढोके, शैलेंद्रसिंह बैस, सागर खडसे, भाजपा, युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व सभी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.