उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- राज्यात महिला व मुलीवर अत्याचाराच्या संतापजनक घटना घडत आहे. त्यात अकोला जिल्हातील तेल्हारा तालुक्यातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली. एका 10 वर्षांच्या चिमुकलीला धमक्या देत तीच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 23 ऑगस्टला समाेर आली हाेती. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी एका 20 वर्षीय नराधम आराेपी यश युवराज गवई याला बेड्या ठाेकल्या होत्या.
तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब काही कामानिमीत्त अकाेटफैल पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील वल्लभनगर येथील नातेवाईकांकडे आले होते. ते त्यांच्या अल्पवयीन मुलीला नातेवाईकांकडे ठेवून बाहेर गेले हाेते. यावेळी मुलीच्या वडीलांचा नातेवाईक असलेल्या यश युवराज गवई याने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार पिडीत चिमुकलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी 23 ऑगस्टच्या मध्यरात्री अकोटफैल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करून याप्रकरणी पाेलिसांनी नराधम आराेपी यश गवई याच्या विराेधात बीएनएस कलम 64, 64 (2), (एफ), (एम), 65, (2), 333, 351 (2) (3), तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4, 5 (एल) (एम) (एन), 6 अन्वये गुन्हा दाखल केला करुन त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या समक्ष हजर केले असता, 26 ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली हाेती. साेमवारी या आराेपीला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 2 दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.