हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- रोजी रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर यांच्या वतीने बल्लारपूर येथील माउंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दंत आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दंतचिकित्सक किशोर मालू सर यांनी जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची (नर्सरी ते चौथीपर्यंत) दंत चिकित्सा शिबिरात तपासणी करून मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ.अनुप जयस्वाल सर यांनी जवळपास एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन प्रशांत दोंतुलवार, रोटरी क्लबचे सचिव रोटे. उत्तम पटेल, माउंट स्कूलचे प्राचार्य शैलेश झाडे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष धनसुखभाई पटेल, आयपीपी प्रफुल्ल चरपे, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोट्रॅक्टर गौरव पटेल, रोटरॅक्ट क्लबचे सचिव रजत परमार, रोटरॅक्ट क्लबचे माजी अध्यक्ष चैतन्य पटेल, क्लब सदस्य हेमराज गेडाम, अमोल गांधी, ध्रुव पटेल यांच्यासह, ओम पटेल, अरविंद डांबरे, देव मेश्राम, मोहित पटेल, अभिषेक गजबे, अनुज अग्रवाल, दीपेश पटेल, जयेश पटेल, सुप्रिया लोखंडे आणि मारिया सोनटक्के कार्यक्रमाला उपस्थित होते.

