हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- भाजप कामगार मोर्चा चे प्रदेश जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे यांनी पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का यांना निवेदन देऊन बल्लारपूरच्या टेकडी विभागात पोलीस चौकी बांधण्याच्या मागणीचे निवेदन दिले. मागील वर्षी पण तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना दिले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सांगितले होते की, पोलीस चौकीचा विषय आम्ही आमच्या आराखड्यात समाविष्ट आहे. जागा निवडून लवकरच काम सुरू करू, असे आश्वासन दिले होते.
विशेष म्हणजे शहरातील जवळपास निम्मी लोकसंख्या टेकडी परिसरात राहते, त्यातही बहुतांश गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, मात्र सर्वच पोलीस चौक्या महामार्गावर असल्याने मदद कामाला विलंब होत असते. मदतीसाठी पोलिस तातडीने पोहोचू शकत नाही, पोलिस चौकी उभारल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळेल, तर गुन्हेगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होईल.