युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन उमरेड:- समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचे संविधान बदलून पाहणाऱ्या मनुस्मृती प्रणित वृत्तीचा माजी मंत्री सुनील केदार यांनी स्पर्धाफास केला तर कलावंतांच्या न्याय हक्कासाठी माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी वाजविली तुतारी.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद व इंडियन युथ अँड वूमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 1 सप्टेंबर 2024 ला कलावंतांच्या भव्य मेळाव्यात माजी मंत्री सुनील केदार आपल्या वक्तव्यात म्हणाले की, भारताचे संविधान बदलवून मनुस्मृती आणण्याचा डाव मणूप्रणित भाजपाचा आहे. एससी, एसटी, ओबीसी चे मानव अधिकार काढून संपूर्ण महिलांचे शिक्षण स्वातंत्र्य बंद करून हुकूमशाही व भटशाहीने देशातील आम जनतेला गुलाम करण्याची वाटचाल भाजप व त्यांच्या मित्र पक्षांची आहे. म्हणून कलावंतांनो या मनु प्रवृत्ती विरुद्ध तुमच्यावर परिवर्तनाची प्रचाराची धुरा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कलावंतांचे फार मोठे योगदान राहिले आहेते पुढे म्हणाले की, माजी आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी कलावंतांच्या पाठीशी असतात व त्यांच्या विविध प्रश्नासाठी ते नेहमी लढतात अशी प्रशंसा त्यांनी केली.
भारतीय अशोक स्तंभ व शाल देऊन प्रकाश गजभिये यांचा सत्कार त्यांनी केला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना प्रकाश गजभिये म्हणाली की, या निवडणुकीचे तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये देऊन सरकारी तिजोरीतून मते खरेदी करण्याचा सपाटा या खोके सरकारने सुरू केलेला आहे. पण हा फसवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील कलावंतांचे शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे महागाईचे प्रश्न दूर सारून ते दिशाभूल करीत आहे. लाडकी बहिणीवर बलात्कार होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना यांनी केलेली आहे. म्हणून हे सरकारच बदलविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे रामटेक लोकसभेत सुनील बाबूंच्या पाठीशी आपण भक्कम पने उभे राहिलेत तसेच महाविकास आघाडीचे विधानसभेत आमदार पाठवा तरच सर्वांना समान न्याय मिळेल असे ते म्हणाले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, जिल्हा परिषद सदस्य सलील दादा देशमुख, विदर्भ शाहीर परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, प्रदेशाध्यक्ष वसंता कुंभरे, केंद्रीय सदस्य मिलिंद खोब्रागडे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथ पारधीकर, विदर्भ संघटक अरुण सहारे, विदर्भ महिला संयोजिका संगीता भक्ते, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम, जिल्हा महासचिव अरुण वाहने, जिल्हा महिला प्रतिनिधी माया गणोरकर, प. स. उमरेडच्या सभापती गीतांजली नागभीडकर, उमरेड नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष गंगाधर रेवतकर, प.स. सदस्या प्रियंका लोखंडे, सभापती मिलिंद सुटे, सभापती माधुरी देशमुख, नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार व उमरेड भिवापूर कुही तालुक्यातील पत्रकार मंडळी मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून सामाजिक परिवर्तनातील महापुरुषांचे फोटो ला पुष्पहार अर्पित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांनी केले तर केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे यांनी कलावंतांची दशा व दिशा, कलावतांसाठी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची वाटचाल याविषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबईचे अतिथी कलावंत ज्युनिअर अमरीश पुरी व ज्युनिअर शाहरुख खान यांनी आपली कला सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या प्रसंगी भिवापूर येथील मान्यवर पत्रकारांचा शिल्ड व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उमरेड विधानसभेतील असंख्य मंडळांचे कलावंत यात सहभागी होऊन दिवसभर त्यांनी आप आपली कला सादर केली. यावेळी सर्व कलावंतांना सन्मानपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन विशाखा तरार यांनी फारच सुंदर रित्या केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते रामभाऊ धनजोडे, नथुजी पडोळे, रमेश सूर्यवंशी, वासुदेव धनजोडे, दिनेश साळवे, उमेश गांगेवार, उत्तम पराते, लीलाधर धनविजय, मुकेश, नामदेव धनजोडे, मुन्ना पटेल शेख, सुधीर मोहोड, हरीश पाटील, आबिद शेख, आमिर खान पठाण, प्रमोद सुटे, मुकेश गायगवळी, विलास मामुलकर ईत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.