मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदी रेल्वे:- पोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा पाडवा म्हणजेच तान्हा पोळा बालगोपालांसाठी एक अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे विदर्भातील ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हरदुलाल मंडळाने महाकालची झांकी काढण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात ही भव्य आणि दिव्य अशी महाकालची झांकी काढण्यात आली होती. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या यावेळी एकूण २८ पेक्षा जास्त झांकी काढण्यात आल्या होत्या. मात्र, एकूण सर्व काढलेल्या झाकींमध्ये राष्ट्रवादीच्या हरदुलाल युवा मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या अशा या भव्य आणि दिव्य अशी महाकालची झांकीने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी जवळपास संपूर्ण विदर्भातील एक लांखा पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. विदर्भातील ऐतिहासिक अशा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ही झांकी लक्षवेधी ठरली.
यावेळी खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी आमदार राजू तिमांडे, सभापती सुधिर कोठारी, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, सहकार नेते वासुदेव गौळकार, शिवसेनेचे विठ्ठल गुळघाने, काँग्रेसचे पंढरी कापसे, प्रवीण उपासे, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर उपस्थिती होते.