रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शहरातील वार्ड क्रमांक 4 मधील नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पारधी वाडा यांच्या समस्या घेऊन ॲड.सुरेश काळे यांनी उपविभागीय अधिकारी परतुर यांना 4 सप्टेंबर रोजी उपोषनासाठी बसण्यासाठी निवेदन दिले होते.
त्या अनुषंगाने आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता समस्त पारधी समाजा सोबत ॲड.सुरेश काळे हे उपोषणाला बसले होते. त्यानंतर विविध संघटनांनी, पत्रकार संघांनी, वकील संघांनी व विविध वार्डातील नगरसेवकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. साठे नगर येथील नगरसेवक बाबुराव हिवाळे, रहिमू कुरेशी, आयुब कुरेशी मराठा क्रांती संघाचे पांडुरंग नवलसर तसेच नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मिरासे त्याचप्रमाणे नगरपरिषदेचे इतर कर्मचारी ही उपस्थित होते.
त्याचप्रमाणे आदिवासी पारधी समाजाचे शेषराव माणिक चव्हाण, चंद्रकांत शेषराव चव्हाण, सुरेश शेषराव चव्हाण, शंकर बाजीराव चव्हाण, विजय सुरेश पवार, मंगल वाघ्या पवार, कठाळू बाजीराव चव्हाण, त्याचप्रमाणे महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यामध्ये सीता शेषराव चव्हाण, लता बाजीराव चव्हाण, जनाबाई गंगाराम चव्हाण, शांता प्रल्हाद काळे, मंगल सुरेश काळे, ललिता कठाळू चव्हाण, अबई चंद्रकांत चव्हाण त्याचप्रमाणे आदिवासी समाजामधील महिला व पुरुष सुद्धा मोठ्या प्रमाणात उपोषणास सहभागी होते.
यामध्ये नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्या मध्यस्थीने ॲड.सुरेश काळे यांनी सदरच्या उपोषणास स्थगिती दिली त्याचप्रमाणे येत्या 16 सप्टेंबर च्या आत जर प्रशासनाने नगरपरिषदेने आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी परत उपोषणाला बसेल असे ॲड.सुरेश काळे यांनी सांगितले.