आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. आज दि. ०९ रोजी हिंगणघाट येथील पुरुषांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०९ सप्टेंबर २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने यादव लडी, आकाश धानवडे, रुपेश सोनवाणे, रोशन निवटे, योगेश तेलरांधे, निलेश ढाकणे, गोलु शेंडे, नितेश मुन ईत्यादीसह अनेक युवा कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी पंचायत समिती सभापती योगेश फुसे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य रवी ऊपासे, विधानसभा प्रमुख रवी लडी, माजी सरपंच शेषराव तुळनकर, शंकरराव धोटे, माजी सरपंच रोशन पांगुळ, माजी नगराध्यक्ष नगरपंचायत समुद्रपूर शीला सोनारे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.