अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील श्वास सेवा संघटनेकडून पिपरी येथे मदतीचा हात म्हणून 2 हजार रुपये प्रति दिव्यांग बांधवांना देण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील 370 दिव्यांग बांधवांना ही मदत श्वास सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुळघाणे यांच्याकडून देण्यात येणार असून याचा श्रीगणेशा पिपरी येथून करण्यात आला.
यावेळी हा कार्यक्रम पिपरी येथील मुकिंदा शास्त्रकार यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्वास सेवा संघटनेकडून या मदतीची घोषणा दिव्यांग मेळाव्यात करण्यात आली होती. तो शब्द पाळत आज श्वास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गुळघाने यांनी या मदतीचा हात दिव्यांग बांधवांना दिला.
श्वास सेवा संघटने कडून अनेक गरजू व निराधार नागरिकांना मदतीचा उपक्रम निरंतर सुरू असते त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिव्यांग बांधवांना ही मदत देण्यात आली असून निरंतर सेवेचा भाव ठेवत श्वास सेवा संघटनेकडून ही मदत करण्यात आली. यावेळी सुनील शिरोडकर, राजू सराटे, विठ्ठलराव काळे, मुकिंदा शास्त्रकार, आयुष मरसकोल्हे जयंत ठाकरे, हर्षल मरसकोल्हे , गोलू मेंडे, गजानन कावळे, खुशाल राऊत, या दिव्यांग बांधवाना मदत देण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना वर्धा जिल्हा महिला प्रमुख सौ संगीता कडू, युवा सेना सर्कल प्रमुख रंजीत राहाटे, निलेश शिंदे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, तालुका अध्यक्ष सतीश गौळकर, शहर अध्यक्ष जगदीश देवतळे, सचिव सचिन भजभूजे प्रामुख्याने उपस्थित होते.