पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विधवा सुनेचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण सासूला लागली. सुनेच्या प्रेमसंबंधात आड येणाऱ्या सासूचा सुनेने 2 लाख रुपयांत सुपारी देऊन हत्या केला. ही खळबळजनक घटना अजनीत उघडकीस आली. सुनीता ओंकार राऊत वय 54 वर्ष रा. मित्रनगर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, आरोपी वैशाली अखिलेश राऊत वय 33 वर्ष रितेश प्रकाश हिवसे वय 27 वर्ष आणि श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे वय 21 वर्ष अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत. भगवान भाऊराव मेंढे वय 57 वर्ष राह.शिवाजी नगर हुडकेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. अजनी पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या तीघांना बेड्या ठोकल्या आहे.
सुनीता राऊत या मुलगा अखिलेश, सून वैशाली आणि पाच वर्षांची नात स्विटीसोबत राहत होते. 2023 मध्ये अखिलेशचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हापासून विधवा सून मुलगी व सासू सोबत राहायला लागली. एकाकी पडलेल्या वैशालीचे काही दिवसांत अनिल नावाच्या तरुणा बरोबर सूत जुळले. तो तिच्या पतीचा मित्र होता. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर दोघांचा चोरुन भेटी व्हायला लागल्या. प्रियकर सासू बाहेर गेल्यावर वैशालीला भेटण्यासाठी घरी येऊ लागला. आपल्या विधवा सूनेच्या प्रेमसंबंधाची कुणकुण सासू सुनीता हिला लागली. त्यामुळे त्यांनी कुटुंबाची इभ्रत वाचविण्यासाठी सुनेची समजूत घातली. तरीही दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. त्यामुळे सासू वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करायची. त्यामुळे सुनेने सासूचा काटा काढायचे ठरविले.
आरोपी वैशाली हीने आपले दोन्ही चुलत भाऊ श्रीकांत ऊर्फ समीर नरेंद्र हिवसे वय 25 वर्ष आणि रितेश प्रकाश हिवसे वय 27 वर्ष राह. भांडारगोंडी, ता. पांढुर्णा – मध्यप्रदेश यांना कटात सहभागी करुन घेतले. सासूच्या मृत्यूनंतर दोन भूखंड आणि घर विकून पैसे मिळाल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरविले. दोघांनीही सुनीता यांचा हत्या करण्यासाठी होकार दर्शविला.
असे घडले हत्याकांड: विधवा वैशालीने 28 ऑगस्टला आपल्या दोन्ही चुलत भावाना रितेश आणि श्रीकांत यांना नागपुर येथे बोलावले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मागच्या दारातून घरात घेतले. त्यानंतर वैशालीने आपल्या सासूचे उशीने नाक-तोंड दाबले तर दोघांनी सासूचा गळा हाताने आवळून हत्या केली. हत्या केल्या नंतर मध्यरात्रीच दोघेही निघून गेले तर सूनेने दुसऱ्या दिवशी सासू हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावल्याचा बनाव केला. नातेवाईकांनीही सुनेच्या बोलण्यावर विश्वास करुन अंत्यसंस्कार पार पडले. अशा प्रकारे हत्याकांड दाबल्या गेले.
असे आले हत्याकांड बाहेर: अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार आणि लक्ष्मण केंद्रे यांना सुनीता राऊत यांच्या मृत्यूबाबत संशय आला. घटनेच्या 12 दिवसांपर्यंत सूक्ष्म तपास केला. त्यांनी 5 वर्षांच्या वैशालीच्या मुलीला चॉकलेट-आईसक्रिम देऊन घटना बाबत विचारपूस केली आणि घरा शेजारी राहणाऱ्या नागरिकांन कडून या घटनेची चौकशी केली. त्यात पोलिसांना आरोपी वैशालीच्या हालचालींवर थोडा संशय बळावला. अंत्यसंस्कार झाल्यामुळे कोणताही धागा नसताना देखील तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यात खात्री झाल्यानंतर वैशालीला ताब्यात घेतले. तिला वारंवार खोटे बोलत असल्याने तिला पोलिसी खाक्या दाखविल्या. त्यामुळे तिने सुपारी देऊन हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन हत्याकांड उघडकीस आणले.