मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर याना सन 23-24 या वर्षी करीत उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मिळाल्याने विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती हिंगणघाटच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार समीर कुणावर यांचा सत्कार करत अभिनंदन केले.
वर्धा जिल्हाच्या इतिहासात आमदार समीर कुणावर हे उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले आमदार ठरले. त्यानी सभागृहात मतदार संघातील विविध प्रश्न मांडून आपल्या भूमिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. मुंबई व नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्यानी तालिका अध्यक्ष म्हणून आपली भूमिका चोक पणे बजावली. त्यांच्या कामगिरीचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सभागृहात स्तुती ही केली. त्यांची विधानसभेतील 90% टक्के उपस्थिती असून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व तालिका अध्यक्ष असताना आमदार पदाची तमा न बाळगता हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालय करिता त्यांनी विधानसभेच्या पायऱ्या बसून आंदोलन करून मतदार संघाला न्याय मिळवून दिला तसेच विविध प्रश्नांवर आपली परखड भूमिका मांडून शासनाने लक्ष वेधले त्यांच्या संपुर्ण कामगिरीचे मुल्यमापन करून शासनाने त्यांना सन 23-24 चा उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्काराने सन्मानित केले.
त्याबद्दल जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार समीर कुणावर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय तामगाडगे, अतुल नंदागवळी, शंकर मुंजेवार, बिंदुसार वावरे, सुरेश गायकवाड, विक्रांत भगत, संजय धाबर्डे, नितीन सुटे, सुरेंद्र टेंभुर्णे, अनुला सोमकुवर, संध्या जगताप, प्रमोदिनी नगराळे, तेजस्विनी पाटील, हेमंत झाडे, मयूर कांबळे, नरेश तामगाडगे, सुहास जीवनकर, संदीप पाटील, अनिकेत डोंगरे आदी सदस्य उपस्थित होते.