राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुभाष धोटे विरुद्ध ॲड. वामनराव चटप अशी थेट लढत यंदा दिसून येत आहे. धाबा येथून ॲड. वामनराव चटप यांच्या प्रचाराचा शंखनाद करण्यात आला यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.
राजुरा – गोंडपिंपरी विधानसभा मतदार संघात ॲड. वामनराव चटप निवडणूक लढणार आहे अशी घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की, इतरांना मतदान करून आपले मतदान वाया घालविण्या ऐवजी खंबीर लोकप्रतिनिधी म्हणून ॲड. वामनराव चटप यांची निवड गोंडपिपरी तालुक्यातील जनता करेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
निवडून दिल्यास तालुक्यात सिंचन प्रकल्प विकास, कृषी आधारित उद्योग निर्मिती, पूर्णवेळ तहसीलदार-गटविकास अधिकारी ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू, पोडसा पुलाची दुरुस्ती, जडवाहतुक व अपघात प्रश्न सभागृहात घेऊन जाईल असे प्रतिपादन ॲड. वामनराव चटप यांनी केले.
यावेळी बैलगाडीवरून वाजत-गाजत धाबा येथून मिरवणूक काढण्यात आली. मुख्य मान्यवर म्हणून शालिकराव मावलिकर, अरुण पा. नवले, निळकंठ पा. कोरांगे, ॲड. दीपक चटप, कपिल ईद्दे, रामकृष्ण सांगडे, अंकुर मल्लेलवार, मारोती भोयर, मनोज कोपावार, सूरज भस्की आदींची उपस्थिती होती.